Devendra Fadnavis : ‘महारेरा’मुळे फसवणुकीच्या तक्रारींमध्ये घट

मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशा प्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो.
Maharera
Maharerasakal
Updated on

पुणे - मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशा प्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो. याबाबतच्या मोठ्या तक्रारी येत होत्या. मात्र, रेराच्या स्थापनेमुळे याला मोठा आळा बसला आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.

ऑल इंडिया फोरम ऑफ रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीजच्या नियामक मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी ‘महारेरा’चे अध्यक्ष तथा फोरमचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्यासह देशभरातील १५ रेरा प्राधिकरणांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

Maharera
Toilet Seva App : स्वच्छतागृह शोधा एका क्लिकवर; पुणे महापालिकेने केले ‘टॉयलेट सेवा ॲप’ विकसित

फडणवीस म्हणाले, ‘२५ वर्षांपासून ग्राहक संघटना, कार्यकर्त्यांची विशेषतः मुंबईत स्थावर संपदेबाबत नियामक व्यवस्था असावी, अशी मागणी होती. त्यामुळे केंद्र सरकारने रेरा कायदा केल्याबरोबर या संधीचा लाभ घेत राज्याने ‘महारेरा’ची स्थापना केली.

संपूर्ण देशात रेरा अंतर्गत नोंदणी होणाऱ्या बांधकाम प्रकल्पातील ४० टक्के प्रकल्प ‘महारेरा’कडे नोंदणी झालेले आहेत. यातूनच महाराष्ट्रातील या कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येते.

बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा रेरा स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे. हे काम महारेरा कडून उत्तम पद्धतीने होते आहे.’’

Maharera
Dombivali News : काँग्रेस प्रदेश सचिव राजन भोसले यांनी केले स्वतःचे हसू; सगळेच झाले हैराण

उपमुख्यमंत्री म्हणाले...

  • राज्य सरकारद्वारे नागरिक, क्रेडाई-एमसीएचआय यासारख्या संस्थांचेही या कायद्याविषयी विचार जाणून घेतले जातात.

  • त्यामुळे ‘महारेरा’ला विकासक, बांधकाम व्यावसायिकांचा विरोध न होता सहकार्यच होते.

  • महत्त्वाचे म्हणजे फसवणुकीविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे घर खरेदीदार नागरिकही समाधानी आहेत.

  • गृहप्रकल्पाच्या जाहिरातीमध्ये पूर्वी बिल्टअप, सुपर बिल्टअप असे उल्लेख करून ग्राहकांची फसवणूक होत असे.

  • आता जाहिरातीतील महारेरा कार्पेट एरियाचा उल्लेख होत असल्याने फसवणुकीला वाव राहिला नाही

महाराष्ट्राने सर्वप्रथम रेराची स्थापना केली. त्यानंतर देशातील एकूण २५ राज्यात ‘रेरा’ची स्थापना झाली आहे. ‘महारेरा’च्या स्थापनेपूर्वी बांधकाम प्रकल्प रखडण्याचे प्रमाण २५ टक्के होते ते आता तीन टक्ंक्‍यावर आले आहे. ‘महारेरा’ने प्रकल्प मंजुरी, अर्ज आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे वेगाने मंजुरी दिली जात आहे. नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारीतही मोठी घट झाली आहे.

- अजोय मेहता, अध्यक्ष, ‘महारेरा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()