सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी? राणेंचा ताफा अडवला

refinery project
refinery project esakal
Updated on

रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला असून सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी? असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे. (refinery project nilesh rane convoy blocked in ratnagiri villagers protest against refinery survey)

रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात पोहचलेत. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हणालेत.

स्थानिक रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण होणार होतं. मात्र निलेश राणेंच्या गाडीचा ताफा येताच ग्रामस्थ आक्रमक होताना दिसले. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला.कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण न करू देण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंचं आता समर्थन कशासाठी? असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तर रिफायनरीचं सर्वेक्षण तातडीनं थांबविण्याची बारसू येथील ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी त्यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो निलेश राणे म्हणाले आहेत.

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता. हे. रिफायनरिला स्थानीक जनतेचा प्रखर विरोध असताना कोणत्या आधारावर ही रिफायनरी आणली जातेय? सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी, असा प्रश्नदेखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.