Dhananjay Munde : कडधान्य, तृणधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन द्या

राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
Dhananjay Munde
Dhananjay Mundee sakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र हे एकेकाळी देशात सर्वाधिक तृणधान्य आणि कडधान्य पिकविणारे राज्य होते. परंतु सध्याच्या काळात मात्र या पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य खूप मागे पडले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा ज्वारी, बाजरीसारखे तृणधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य पिकांकडे वळवावे लागेल.

यासाठी चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहित करा आणि रब्बी हंगामात या पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, यादृष्टीने प्रयत्न करा, असा आदेश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता.१७) पुण्यात आयोजित कऱण्यात आलेल्या एका बैठकीत बोलताना कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.

राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले आदी उपस्थित होते.

मुंडे पुढे म्हणाले, ‘यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील काही भागात खुपच कमी पाऊस झाला आहे. अशा भागांतील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी उन्हाळी आवर्तने सोडणे कठीण दिसत आहे. त्यामुळे उन्हाळी आवर्तनावर अवलंबून असलेल्या पिकाचे क्षेत्र हे यंदा रब्बी पिकांच्या, चारा पिकांच्या उत्पादनाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

यासाठी करडई, जवस, तीळ, मोहरी, पिवळी ज्वारी आदी कमी लागवड असलेल्या तृणधान्य, गळीत धान्याच्या लागवडीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.’

या बैठकीत कृषी यांत्रिकीकरण, यांत्रिकीकरणअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना उप अभियानाचाही आढावा घेण्यात आला. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी २० हजार ७८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले.

रब्बी पिकांचे ५९ लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट

या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी रब्बी हंगामातील नियोजनाबाबतचे दृश्‍यश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण केले. राज्यातील रब्बी पिकांचे एकूण सरासरी क्षेत्र हे ५३ लाख ९८ हजार हेक्टर इतके आहे.

मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या पुरेशा प्रमाणात झाल्या नसल्याने, यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र सरासरी क्षेत्राहून अधिक निश्‍चित केले आहे. यानुसार यंदाच्या रब्बी हंगामात ५८ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.