Ahmednagar: नगरचं अहिल्यानगर करून भाजपने प्रस्थापितांचा केला गेम? नामांतरामागची खेळी

Rename of Ahmednagar district beneficial for BJP
Rename of Ahmednagar district beneficial for BJP esakal
Updated on

औरंगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. त्यासोबत उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले. आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यादेवी होळकर करण्यात येणार असल्याचं बोललं जातयं. पण जिल्ह्यांच्या या नामांतरामागे भाजपची खेळी असल्याचे बोललं जात आहे.

Rename of Ahmednagar district beneficial for BJP
Mumbai Crime: दारूमुळे झाला कर्जबाजारी, मग कर्ज फेडण्यासाठी थेट डॉमिनोजमध्ये चोरी

काय आहे राजकीय गणित जाणून घेऊ....

तर अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगचे नामांतर करुन जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. यानंतर याच कार्यक्रमात उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या नामांतराच्या मागणीला दूजोरा दिला. पण अहमदनगच्या या नामांतरामागे भाजपची मोठी खेळी असल्याचे बोलल जातयं.

धनगर मतं आपल्या बाजूने वळवणे

तर महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या दिड कोटी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळपास १० टक्के आहे. अर्थात मतांचा एक मोठा भाग. आता आर या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. त्यात आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा प्रवर्ग आपल्याकडे वळवण्याचा हा हेतू आहे.

त्यातलाच एक भाग म्हणजे अहमनगर जिल्ह्याचे नामांतर. कारण धनगर समाज आहिल्याबाई होळकर यांना आपले आदर्श मानतो त्यामुळे अहमनगर जिल्ह्याचे नामांतर करुन धनगर समाजाची मतं आपल्याकडे वळवुन घ्यायची.

Rename of Ahmednagar district beneficial for BJP
Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

गोपीचंद पडळकर धनगर समाजाचा चेहरा

जसं की आधीही सांगितलं धनगर समाज हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. पण या समाजाने नेतृत्व करणारा कोणताही मोठा चेहरा नाही. म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून जानकर हे साईड लाइन झाल्याचं दिसतयं.

पण यात आता भाजप नेते गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचा चेहरा म्हणून समोर येत आहे. मगं धनगर समाजाच्या हक्कासाठी आंदोलन असो, किंवा सध्याचे अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर गोपीचंद पडळकरांनी हा मुद्दा उचलून ठरला. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचा चेहरा म्हणून समोर येत आहेत .

बारामती लोकसभा मतदारसंघ

सध्या बारामतीत सुप्रिया सुळे खासदार आहेत. आणि बारामती मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जसं की आपण आधी पाहिलं गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचा चेहरा म्हणून समोर येत आहेत.

अशात आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. आणि यात भाजप सक्सेसफुल होण्याची चिन्ह देखील आहे. म्हणचे २०१४ ची लोकसभा निवडणूक आठवत असेल तर धनगर नेता असलेले महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंना टफ फाईट दिली होती.

सुप्रिया सुळे या फक्त ७० हजार मतांनी जिंकल्या होत्या. या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य जवळपास १७ टक्क्यांनी कमी झालं होत. तर जानकरांचे माताधिक्य ४० टक्क्यांनी वाढलं होत. या यामागचं कारण अर्थात धनगर समाज. आणि आता गोपीचंद पडळकरांना जर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं केलं तर अहमदनग जिल्ह्याचे नामांतर चांगलाच पॉवर प्ले ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()