Devendra Fadnavis: कर्नाटकमुळे फडणवीसांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या खोट्या

कर्नाटकच्या प्रचारात दगदग झाल्याने फडणवीसांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत झालेल्या प्रवासाचा ताण या सर्व कारणांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली. त्याचबरोबर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेतली असल्याच्या बातम्या काही वृत्त वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी चालवल्या होत्या मात्र या बातम्या खोट्या असल्याचं समोर आलं आहे.

'सकाळ'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचे कोणतेही कार्यक्रम रद्द झालेले नाहीत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस नड्डा यांच्या स्वागतासाठी जाणार आहेत. नड्डा आज मुंबईत येणार असून उद्या पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadanvis
Maharashtra Politics: 'जिवाभावाचा माणूस...' BJP नेत्याचा वाढदिवस, पोस्टरमध्ये पवारांसह अजितदादांचा फोटो

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस कर्नाटकाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तेथील भाजपच्या उमेदवारांसाठी अनेक सभा घेतल्या. कर्नाटकमधील प्रचार आटोपून मुंबईत आल्यानंतर त्यांनी अमरावती, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसह सोमवारी पुणे, पिंपरी-चिंचवडचा दौरा केला होता.

Devendra Fadanvis
Crime News: 'गुप्तचर विभागातील अधिकारी सांगून...' एनआयए कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रणरणत्या उन्हात झालेल्या दौऱ्यांचा परिणाम फडणवीस यांच्या प्रकृतीवर झाला. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या या बातम्या खोट्या असल्याचं समोर आलं आहे.

तर कल देवेंद्र फडणवीस काल प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर त्यांच्या ट्विटरवर त्यांनी एका कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. त्यामध्ये ते जमलेल्या लोकांशी संवाद साधतान दिसून येत आहेत.

Devendra Fadanvis
Eknath Shinde : कोणत्याही परिस्थितीत शिक्षक-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार; CM शिंदेंचं मोठं आश्वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.