Maharashtra BJP : निवडणुकीची तयारी सुरू झाली, महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत
Maharashtra BJP
Maharashtra BJPEsakal
Updated on

आगामी निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आणि भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० पक्षासाठी नावांची घोषणा केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत नावांची आणि पदांची माहिती दिली आहे.

Maharashtra BJP
Weather Update: आज राज्यात मुसळधार, पुण्यासह 'या' 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

ट्विटमध्ये काय म्हंटलं आहे?

'भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.'

Maharashtra BJP
Sakal Podcast : सरकार खरेदी-विक्रीत सत्ताधारी मग्न ते किरीट सोमय्या प्रकरणी विधानपरिषदेत गोंधळ

'मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत'

'भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे' असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

Maharashtra BJP
Koyna Dam Update : मोठा दिलासा! आपत्कालीन परिस्थितीवर मात करत कोयना धरणातून तब्बल 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.