Mumbai High Court : औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतर प्रकरणात मोठी अपडेट! दोन्ही जिल्ह्यांची नावे तीच राहणार

revenue areas names continued to be Aurangabad and Osmanabad not chhatrapati sambhajinagar and dharashiv
revenue areas names continued to be Aurangabad and Osmanabad not chhatrapati sambhajinagar and dharashiv sakal
Updated on

राज्यातील दोन शहरे औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने या दोन शहरांची नावे छत्रपची संभाजीनगर आणि धारशिव करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला विरोध देखील झाला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसूल क्षेत्र (जिल्हा आणि तालुका पातळीवर) औरंगाबाद आणी उस्मानाबाद हीच नावे राहणार आहेत. मुंबई हायकोर्टाने याबद्दलचा निर्णय जाहीर केला आहे.

न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर फक्त शहरापुरतं झालं होतं. जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांच्या वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला होता. यानंतर महसूल आणि जिल्हा पातळीवरच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.

revenue areas names continued to be Aurangabad and Osmanabad not chhatrapati sambhajinagar and dharashiv
Devendra Fadnavis : अजित पवारांना धक्का! भाजप नेत्यांना दिलासा देत फडणवीसांनी बदलला १५ दिवसांपूर्वीचा 'तो' निर्णय

जेव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. तसेच तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे. आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.

revenue areas names continued to be Aurangabad and Osmanabad not chhatrapati sambhajinagar and dharashiv
Pune News : लोकसभेसाठी पुण्यात भाजप देणार नवा गडी! मुरलीधर मोहोळांचा पत्ता होणार कट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.