Revenue Department : परिविक्षाधीन ७० तहसीलदारांची प्रतीक्षा समाप्त ; महसूल विभागाकडून नियुक्त्यांचा आदेश

महसूल विभागाच्या प्रशासकीय बदल्यांसाठी घोडेबाजारीला ऊत आला असून नियमित तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये तब्बल शेकडो कोटींची उलाढाल होत आहे. परिविक्षाधीन ७० तहसीलदारांना गेल्या सात महिन्यांपासून नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागत असल्याची बातमी ‘सकाळ’ ने दिली होती.
Revenue Department
Revenue Departmentsakal
Updated on

महेश जगताप

मुंबई : महसूल विभागाच्या प्रशासकीय बदल्यांसाठी घोडेबाजारीला ऊत आला असून नियमित तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये तब्बल शेकडो कोटींची उलाढाल होत आहे. परिविक्षाधीन ७० तहसीलदारांना गेल्या सात महिन्यांपासून नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागत असल्याची बातमी ‘सकाळ’ ने दिली होती. याची दखल घेत महसूल विभागाने आठवडाभरातच कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अमरावती अशा पाच महसूल विभागांमध्ये या ७० परिविक्षाधीन तहसीलदारांना नियुक्ती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.