इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता.
कऱ्हाड : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये (RG Kar Medical College) एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीवर कर्तव्यावर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (Indian Medical Association) अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा वगळता नियमित बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) पहाटे सहा ते रविवारी (ता. १८) पहाटे सहा वाजेपर्यंतच्या २४ तासासाठी बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल देसाई यांनी दिली आहे.