मोहोळच्या वृद्धाला लुटणारा रिक्षावाला जेरबंद! टोळीतील दोघांनाही अटक; फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी

बाळे येथून रिक्षात बसलेल्या मोहोळच्या ६७ वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. शिवम चंद्रकांत अलकुंटे, अभिजित रमेश जाधव व अभिषेक नागनाथ अडगळे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
crime news
solapur crimesakal
Updated on

सोलापूर : बाळे येथून रिक्षात बसलेल्या मोहोळच्या ६७ वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. शिवम चंद्रकांत अलकुंटे (वय २५, रा. बुधवार पेठ, वडार गल्ली), अभिजित रमेश जाधव (वय ३१, रा. उत्तर कसबा, कैकाडी गल्ली) व अभिषेक नागनाथ अडगळे (वय २१, रा. भवानी पेठ) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह एकूण तीन लाख ९८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मोहोळमधील सुधाकर गणेश गायकवाड बाळे येथून सोलापूरच्या एसटी स्टॅण्डकडे जाण्यासाठी एका रिक्षात (एमएच १३, सीटी ८१७०) बसले होते. रिक्षात अगोदरचेच दोघेजण होते. रिक्षावाला व त्याच्या साथीदारांनी मिळून ५ जूनला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गायकवाड यांना तुळजापूर रोडवरील डी-मार्टसमोरील रोडवर नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दोन हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर ‘फोन पे’वरील रक्कम पाहून कोंडी येथील पेट्रोलपंपावरील क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढून घेतले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांच्या अवघ्या २४ तासांतच मुसक्या आवळल्या. तत्पूर्वी, सीसीटीव्ही फुटेज आणि वृद्धाने सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून खबऱ्यांनाही पोलिसांनी अलर्ट केले होते. ६ जूनला सायंकाळी पोलिसांना खबर मिळाली, आणि पोलिसांचे पथक खासगी वाहन घेऊन जुना पूना नाका येथील नाल्याजवळ पोचले. त्याठिकाणी रिक्षात थांबलेले संशयित दिसले पोलिसांनी त्यांना पळून जाताना ताब्यात घेतले.

‘या’ पथकाची कामगिरी

रिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अजय पाडवी, प्रवीण चुंगे, अयाज बागलकोटे, शिवानंद भिमदे, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, विनोदकुमार पुजारी, सचिनकुमार लवटे, नितीन मोरे, अजय चव्हाण, अमोल खरटमल, पंकज घाडगे, सुधाकर माने, अर्जुन गायकवाड, अतिश पाटील, शशिकांत दराडे, तौसिफ शेख यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.