Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल; काय आहे कारण?

'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' राऊतांना वक्तव्य भोवलं
Sanjay Raut controversial statement
Sanjay Raut controversial statement
Updated on

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य करणं महागात पडलं आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.(Rights violation action against Sanjay Raut controversial statement )

संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. तसेच, मविआमधीलही नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांना यासंदर्भात सहमती दर्शवली होती.

Sanjay Raut controversial statement: संजय राऊतांविरोधात राज्य सरकार उचलणार मोठं पाऊल?

राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सभागृहात जोरदार चर्चा

संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत.

त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत. असं प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं.

Rahul Gandhi: लंडनला पोहचताच राहुल गांधींमध्ये झाला मोठा बदल; नवा लूक व्हायरल

तर, अजित पवारांनी सहमती दर्शवली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे.

राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकानं शिस्त पाळायला हवी. संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे.

पण कुणी काहीही बोलायला नको. त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघायला हवं. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळानं घ्यायला हवा. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()