Rohit Pawar: भाजपासोबत जाण्याच्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवार म्हणाले 'माझी भूमिका इतकी..'

भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली होती का? या प्रश्नावर रोहित पवारांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
Rohit Pawar
Rohit PawarEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपुर्वी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी शिवसेना- भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आणि दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून पक्षातील एकूण आमदारांपैकी जवळपास ४० आमदार अजित पवारांबरोबर असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार महायूतीत सहभागी झाल्यापासून आमदार रोहित पवार शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसून येत आहेत. अशातच वारंवार चर्चा होते ती, अजित पवारांनी रोहित पवारांना ऑफर दिली होती का? या प्रश्नाची. या प्रश्नावर आता रोहित पवारांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

Rohit Pawar
Bacchu Kadu: सचिन तेंडूलकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू अन् कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली होती का? यावर रोहित पवार बोलताना म्हणाले की, "माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की त्यांनी (अजित पवार) मला विचारलंच नाही." 'मुंबई तक'ला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Rohit Pawar
Eknath Khadse : अजितदादांसारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी फडणवीसांची सही लागते ; खडसेंचा टोला

पुढे ते म्हणाले की, "मी अजित पवार यांचा पुतण्या आहे. दादांबद्दल आदर आहे का? असं तुम्ही मला विचारलं तर व्यक्तिगत स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहेच. पण त्यांनी आज जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते आता ज्या भाजपाच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत. तो विचार मला आवडत नाही. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे", असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

Rohit Pawar
Sharad Pawar News : संघटन बांधणीतही शरद पवारांचे लक्ष जिल्ह्याच्या कांद्याकडे; नाशिकमध्ये लवकरच बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.