पुणे : भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर व्हिडिओवरुन टीका करित आहे. या व्हिडिओत राहुल हे एका नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. याबाबत पक्षानेही स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधीच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनीही उडी घेतली आहे. ते आपल्या टिट्वमध्ये म्हणतात, कुठं जावं, काय करावं हा राहुल गांधीचा (Rahul Gandhi) वैयक्तिक प्रश्न असल्याने याबाबत भाजपकडून (BJP) होणारी टीका अनाठायी आहे. एक मात्र खरयं... देशात बेरोजगारी, महागाई, युवकांचे असंख्य प्रश्न असताना भाजपला राहुल गांधींची आठवण होते. (Rohit Pawar Attack On BJP Over Rahul Gandhi Viral Video)
यातच त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं !, अशा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. सदरील व्हिडिओ हा भारताचा मित्र देश नेपाळमधील आहे. राहुल हे आपल्या पत्रकार मित्राच्या लग्नासाठी गेले होते. मित्र-मैत्रिणी, कुटुंब असणं आणि विवाहा सोहळ्याला उपस्थित राहणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.
विवाहासोहळ्यात सामील होणे हे अजून तरी गुन्हा ठरत नाही. कदाचित पुढे भाजप विवाहसोहळ्यात सहभागी होणं आणि मित्रमैत्रिणी असणे हा गुन्हा ठरवेल, असे प्रत्युत्तर भाजपला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.