'सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा...'

रोहित पवारांनी घेतला मनसे व भाजपचा समाचार
 Rohit Pawar
Rohit Pawaresakal
Updated on

अहमदनगर : मागच्या वर्षी सर्व धार्मिकस्थळ बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन, बेड, औषधं यासाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीयवाद निर्माण केले जात आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षावर केली आहे. महाराष्ट्रात भोंग्यांवरुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत. त्यावर आज गुरुवारी (ता.२१) केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मत व्यक्त केले असून मनसे (MNS) व भाजपचा (BJP) समाचार घेतल आहे.(Rohit Pawar Criticize Maharashtra Navniman Sena And BJP For Religious Politics)

 Rohit Pawar
औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

रोहित म्हणतात, कुणाला वाटतं असेल की माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेच कमळ फुलेल किंवा काहींना वाटतं असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व भाजपला केले.

 Rohit Pawar
टेम्पोने धडक दिल्याने शाळकरी मुलगा जागीच ठार, नातेवाईकांनी फोडला हंबरडा

सध्या राज्यात भोंग्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. महागाई, बेकारी यासह इतर सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्नांकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करित आहेत. धार्मिक मुद्दे उपस्थित करुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.