पुणे : नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या 'मैने'ला पद्म पुरस्कार दिला जातो. पण 'माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली', या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने प्रतिष्ठित नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज बुधवारी (ता.पाच) केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. पुढे आपल्या ट्विट ते म्हणतात, की कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुळ साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा, ही केंद्र सरकारला विनंती असल्याचे रोहित पवार म्हणाले.(Rohit Pawar Criticize Modi Government For Not Inducting Anna Bahu Sathe Name Into Ambedkar Foundation List)
काही दिवसांपूर्वीच रोहित यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. डाॅ. आंबेडकर फाऊंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. अण्णाभाऊंच्या नावाचा समावेश करण्याचा आदेश केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याचे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी फाऊंडेशनला पत्र लिहून कळवले होते. साठे यांच्या नावाचा समावेश करावा अशी विनंती त्यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.