पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक झालं आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवर सिया रजपूत असे नाव एडिट करण्यात आलेय.
सिया रजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात पवारांच्या पेजवरुन करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. रोहित पवार यांना फेसबुकवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक केले, याचा सुगावा अजून लागलेला नाही.
रोहित पवारांचं ट्वीट
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
सोशल मीडियावर अकाऊंट हॅक करण्याचे प्रकार सर्रास वाढलेले आहेत. अनेक संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय नेत्यांच्या बाबतीत असे प्रकार वाढत आहेत. अनेकांच्या अकाऊंटवरुन नको नको ते अपलोड केले जाते. त्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय.
रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक झाल्यानंतर त्यावर रोहित पवार यांच्या नावासह कंसामध्ये सिया राजपूत हे नाव वाढवण्यात आलंय. हॅक केल्यानंतर या पेजवर पुढीलप्रमाणे पोस्ट करण्यात आलीय.
Announcement regarding the name change:
Dear followers, we will change the name of our page to Siya Rajput. We will remove our founder's name ( Rohit Rajendra Pawar ) from the page name and now use the full name of our company (Siya Rajput).
Current Page Name: Rohit Rajendra Pawar
Desired Page Name: Siya Rajput
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.