Rohit Pawar: अजित पवारांच्या व्हिडिओवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'दादांनी जो विकास केला त्यावरती...'

Rohit Pawar on Ajit Pawars Video: अजित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत जनतेला भावनिक साद घातली आहे. यात त्यांनी विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देत अर्थसंकल्पाबाबत आणि केलेल्या घोषणाबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवरती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar on Ajit Pawars Video
Rohit Pawar on Ajit Pawars VideoEsakal

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा देखील केल्या. तर अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणांचा पाऊस पाडला असल्याचं म्हणत विरोधकांकडून टीका करण्यात आली. यानंतर आता अजित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत जनतेला भावनिक साद घातली आहे. यात त्यांनी विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देत अर्थसंकल्पाबाबत आणि केलेल्या घोषणाबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवरती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या संदर्भात बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, आम्ही योजनेसाठी कधी कोणाला बोललेलो नाही. जे कोण बोलत आहेत ते सामान्य लोक आहेत. ते ही लोकशाहीच्या म्हणजे निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या स्वरूपात ते बोलून दाखवत आहेत. आम्ही कधीही दादांनी जो विकास केला. त्याबाबतीत आम्ही कधीही काहीही बोललेलो नाही. आम्ही त्यांचे विचार बदलण्यावर बोलले आहेत. बदललेल्या भूमिकेवर बोललेलो आहे, असंही पुढे रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar on Ajit Pawars Video
NEET Exam: नीट परीक्षेत लातूरमध्ये दहा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिले, इतर परीक्षांचाही होणार तपास; CBIचे अधिकारी ठाण मांडून

रोहित पवार बोलताना म्हणाले, आरोप ज्यांनी केले त्यांच्यासोबतच ते जाऊन बसलेत. आरोप करणाऱ्यांविरोधात ताकदीनं लढण्याची गरज होती. त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांसोबतच ते गेले आहेत. पक्ष महत्त्वाचा मात्र विचार देखील महत्त्वाचे आहेत. विचाराला सोडून भाजपबरोबर जावं लागलं, असंही पुढे रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar on Ajit Pawars Video
Vasant More: वसंत मोरेंचं ठरलं! लवकरच ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

अजित पवार यांनी आज राज्याच्या १३ कोटी जनतेला महत्त्वाचा संदेश दिला आहे. अजित पवारांकडून सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात त्यांनी बजेटमधील घोषणांचा पुनरुच्चार केला आणि विरोधकांवर निशाणा साधला. राजकीय जीवनात कधीही पक्ष बदललेला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो. मागे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण, कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.

Rohit Pawar on Ajit Pawars Video
Sambhaji Raje: संभाजीराजे आक्रमक! फडणवीसांसह अभिनेता स्वप्नीलला झोडलं, विधान भवनावर चालून येण्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com