Sharad Pawar: मैदानात योद्धा जखमी झाला तरी... मॅक्सवेलची एका पायावरची इनिंग पाहून रोहित पवारांनां आठवले शरद पवार

ग्लेन मॅक्सवेलचं कौतुकही रोहित पवारांनी यावेळी केलं आहे
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

काल अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला. ग्लेन मॅक्सवेल याने एकाट्याने खिंड लढवली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात द्विशतक झळकावलं.

फलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला नीट पळताही येत नव्हतं, पण तरीही तो खेळत राहीला आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजयाचा उंबरठा पार करुन दिला. त्याच्या या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे, अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यासंबधी एक पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

Sharad Pawar
Maratha Reservation: '२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू', मनोज जरांगेंनी दिला इशारा

ग्लेन मॅक्सवेलचं कौतुकही रोहित पवारांनी यावेळी केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलची एका पायावरील खेळी पाहून रोहित पवारांनां शरद पवार पवारांची आठवण झाली. ग्लेन मॅक्सवेल आणि शरद पवार यांचा फोटो शेअर करत रोहित पवारांनी एक पोस्ट लिहली आहे.

Sharad Pawar
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी

रोहित पवारांनी काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

"परिस्थिती कितीही विरोधात असली...मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते, मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं..", अशी पोस्ट रोहित पवारांनी लिहली आहे.

Sharad Pawar
Maratha Reservation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर; मनोज जरांगेंची भेट घेणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.