Rohit Pawar: रोहित पवारांची ईडीच्या अधिकाऱ्यांना विनंती; म्हणाले, मराठा आरक्षण...

बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawaresakal
Updated on

मुंबई : 'बारामती अॅग्रो लि' प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. या नोटिशीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करुन त्यांनी ईडीला विनंती केली असून दिलेल्या वेळेआधीच बोलवावं आपण तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. (rohit pawar requested ed officials to call him for enquiry on 22 or 23 January not on 24 January due to maratha morcha)

रोहित पवार म्हणाले, "ED च्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन, मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतू काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. (Latest Marathi News)

MLA Rohit Pawar
Bilkis Bano Advocates: बिल्किस बानोच्या वकील अ‍ॅड. शोभा गुप्ता यांना बढती; सुप्रीम कोर्टानं दिला वरिष्ठ वकिलाचा दर्जा

म्हणूनच ED ला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ही विनंती मान्य करेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

MLA Rohit Pawar
Rohit Pawar : 'बारामती अ‍ॅग्रो' प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी बोलावलं

ईडीनं का पाठवली नोटीस?

काही दिवसांपूर्वी ईडीने 'बारामती अॅग्रो लि.' कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. रोहित पवार हे या कंपनीचे सीईओ आहेत. त्यामुळं त्यांच्याशी संबंधित पुणे आणि बारामतीमधली काही ठिकाणांवरही आयकर विभाग आणि ईडीनं छापेमारी केली होती.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीनं राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत 'बारामती अॅग्रो'चा संबंध होता का? हे तपासलं होतं. लिलाव प्रक्रियेत मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत विक्री झालेली होती, त्यात रोहित पवारांचं नाव आलं होतं. याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीनं समन्स पाठवलं असून येत्या बुधवारी, २४ जानेवारी रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.