कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात पावसात एकट्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते आंदोलनाला बसले आहेत.
रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आंदोलनाला बसले आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांशी रोहित पवार यांनी पत्रव्यवहार केला. मात्र लवकर अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिलं आहे. आता शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित ओवर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली आंदोलन करत आहेत.अधिसूचना तातडीने जाहीर व्हावी अशी त्यांची मागणी आहे.
भर पावसात रोहित पवार यांचं आंदोलन सुरूच आहे. रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गेले होते. आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील देखील रोहित पवार यांची भेट घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.