'पंतप्रधान मोदींचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपाने आणलीय'

गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आता तरी वेसण घालावी.
Narendra Modi And Rohit Pawar
Narendra Modi And Rohit Pawaresakal
Updated on

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma), दिल्लीचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केल्याने मुस्लिम समुदायामध्ये संतापाची लाट आहे. त्याचा पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. भाजपने शर्मा यांना निलंबित केले असून जिंदाल यांना बडतर्फ केले आहे. (Rohit Pawar Says Because Of BJP Spoke Persons Prime Minister Image Spoil)

Narendra Modi And Rohit Pawar
PM मोदी जारी करणार नवी नाणी, 10,20 नाण्यांचं रुप बदलणार

यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर ट्विट करुन टीका केली आहे. ते म्हणतात, राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळी भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसचं आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे, या शब्दांमध्ये पवार यांनी भाजपचा समाचार घेतला.

Narendra Modi And Rohit Pawar
नुपूर शर्मा प्रकरणी भाजपने झटकले हात; निवेदनाद्वारे दिलं स्पष्टीकरण

विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत. किंबहुना त्यांच्या या 'लाय...' मुळचं महाराष्ट्रात भाजपने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आता तरी वेसण घालावी, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.