Rohit Pawar : ''मलासुद्धा प्रेमपत्रं आलीत, त्याची उत्तरं देतोय'' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

rohit pawar
rohit pawar esakal
Updated on

मुंबईः अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये जो चेहरा दिसतोय तो रोहित पवारांचा आहे. शरद पवारांनंतर रोहित पवारांचीच चर्चा होतेय. पक्षातून फुटून गेलेल्या नेत्यांवर ते जोरदारपणे हल्ला करत आहेत.

आज माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी एक गौप्यस्फोट केला. ईडीच्या भीतीने आमच्यातील काही सहकारी बाहेर गेल्याचं शरद पवारांनी बीडच्या सभेत सांगितलं होतं. त्याच अनुषंगाने रोहित पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला होता.

rohit pawar
''भंडाऱ्यात शरद पवारांच्या स्वागतासाठी मी जाणार, कार्यकर्त्यांनी सभेसाठी गर्दी करावी'' प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे आश्चर्य

त्यावर रोहित पवार म्हणाले की, मला लव्ह लेटर आलं नाही असं नाहीये. मला जे लेटर आलेले आहेत त्याला उत्तरं देत आहे. भविष्यात आणखी पत्रं येतील, त्यालाही उत्तरं देईल. परंतु मी या गोष्टींवर फारकाही चर्चा करत नाही. याचा अर्थ मला लव्ह लेटर आलेलं नाही, असं नाही.

रोहित पवार पुढे म्हणाले की, माझं वय ३८ वर्षे आहे. मला पुढे बराच काळ राजकारण करायचं आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेत तफावत येणार नाही, हे नक्की. रोहित पवार सध्या भाजपच्या नेत्यांवर आक्रमकपणे भाष्य करीत आहेत. त्यामुळेच त्यांना कुठल्या चौकशीसंदर्भात नोटीस आली का? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

rohit pawar
Sharad Pawar : कोल्हापुरातील उद्याच्या सभेचा शरद पवारांना फायदा होणार का? जिल्ह्यात 'हे' चार फॅक्टर आहेत महत्त्वाचे...

दरम्यान, उद्या कोल्हापुरात शरद पवारांची सभा होत आहे. या सभेला संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत. येत्या लोकसभेला शाहू महाराज शरद पवार गटाचे उमेदवार असतील, असं बोललं जात आहे.

शाहू महाराजांच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी सांगितलं की, समतेचा, पुरोगामी विचार देण्यासाठी शाहू महाराज येत आहे. बाकी त्यामागे कसलंही राजकारण नाहीये. पुरोगामी विचारावर चालणारे आम्ही कार्यकर्ते असून पुढेही याच विचारांवर काम करणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.