Good News : सरकार उभारणार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र

उदय सामंत-रोहित पवार मिटिंग
उदय सामंत-रोहित पवार मिटिंग
Updated on

अहमदनगर ः राज्यात सध्या प्रवेश आणि परीक्षा याचा गदारोळ सुरू आहे. दहावी-बारावीच्या निकालाचीही प्रतीक्षा आहे. दुसरीकडे पदवीधर किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यांना नोकर भरतीची आस लागली आहे. अगदी वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंतची पदभरती कधी होते, असा सवाल तरूणाईकडून केला जात आहे.

एकंदरीत लोकभावनेचा विचार करताना नोकर भरतीबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे नेहमी तरूणांच्या प्रश्नात लक्ष घालत असतात. ते सातत्याने सोशल मीडियावर यावर मत व्यक्त करतात. किंवा काही तरूण त्यांना नोकर भरतीबाबतच्या समस्या कानावर घालीत असतात. ते शक्य तेवढी वेळ देऊन ती समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एक आनंद वार्ता सांगितली आहे.(Rohit Pawar told good news about competitive exams)

उदय सामंत-रोहित पवार मिटिंग
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवांशिवाय गट ब, क आणि ड वर्गातील पदांबाबत रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. या पदांबाबत अनेक तरूणांना माहिती नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवांच्या या पदांबाबत बरेच तरूण अनभिज्ञ असतात, असंही निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. या परीक्षांमध्ये मराठी युवांचं प्रमाण अवघं दीड टक्का आहे, याबाबत आमदार पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, हे प्रमाणात वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात अद्ययावत 'विभागीय स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र' सुरू करण्यास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. या बाबत त्यांच्यासोबत बैठक झाली आहे. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो युवांना नोकरी मिळेल, असा विश्वास आहे. ही मराठी तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे.

तरूणाई काय म्हणते...

रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टबाबत सोशल मीडियात मतमतांतरे आहेत. काही तरूणांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. तर काही तरूण राज्य सरकारने स्थगित केलेली भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी केली आहे. काही तरूणांनी बिहार राज्यातच आयएएस अॉफिसर कसे होतात. राज्य सरकारने त्याकडे लक्ष केंद्रीत करून उपाययोजना कराव्यात, असाही सल्ला दिला आहे.

...तर नक्कीच टक्का वाढेल

केवळ मार्गदर्शनाअभावी अनेक तरूण नोकरीपासून वंचित असतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर विचार करीत आहे. मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतल्यास नक्कीच मराठी तरूणांचा केंद्रीय सेवांमध्ये नोकरीचा टक्का वाढेल.

- रोहित पवार, आमदार कर्जत-जामखेड.

(Rohit Pawar told good news about competitive exams)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()