Roshni Shinde Beating Case: 'रोशनी शिंदे मारहाण प्रकरण ही स्टंटबाजी', भावना गवळींनी घेतली अमित शहांची भेट

रोशनी शिंदे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे.
Roshni Shinde Beating Case
Roshni Shinde Beating Case
Updated on

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. याप्रकरणी पत्रदेखील शहा यांना दिले असल्याची माहिती गवळी यांनी दिली आहे. (Roshni Shinde Beating Case Bhavana Gawali met Amit Shah maharashtra politics )

भावना गवळी यांनी माध्यमांशी संवाद साधताना रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. रोशनी शिंदे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप गवळी यांनी यावेळी केला आहे.

Roshni Shinde Beating Case
Roshni Shinde Beating Case: रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, अखेर पोलीस आयुक्तांचा अहवाल सादर

भावना गवळी काय म्हणाल्या?

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अमित शहा यांना निवदेन देण्यात आलं आहे. रोशनी शिंदे यांनी कोणतीही मारहाण झालेली नाही. हे त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं आहे. तसेच डॉक्टरांच्या अहवालातही या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

ठाकरे गटाच्या खासदारांनी गृहमंत्र्यांना जे निवदेन दिलं आहे. ते अत्यंत चुकीचं निवेदन त्यांनी केलं आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होता.

Roshni Shinde Beating Case
BJP Foundation Day 2023: लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा निर्धार! विरोधकांना भुईसपाट करण्यासाठी आखला मास्टर प्लॅन!

खर तर त्यांनी ठाण्यात प्रवेश करायचा होता. पण त्यांना जाण्यासाठी कोणताचं मार्ग नव्हता. म्हणून रोशनी शिंदेंचे प्रकरण ठाकरे गट चालवत आहे. मात्र, पोलिसांचा जो अहवाल आला आहे त्यात स्पष्ट झालं आहे की त्या ठिकाणी काहीही झालेलं नाही.

सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी पत्र दिलं आहे. त्यामध्ये रोशनी शिंदे स्टंटबाजी केली आहे. शिंदे सरकारला बदनाम करायचं. फडणवीस यांच्यावर आरोप करायचे. केवळ यांच्याकडे हेच काम उरले आहे. त्यामुळे खोट्या लोकांचीच तपासणी करा, अशी मागणी मी करत आहे.

ज्यावेळी शीतल म्हात्रेचं प्रकरण झालं होत त्यावेळी त्यामध्ये कोण होतं हे निष्पण्ण झाल्यानंतर तेव्हा यांनी एक महिला म्हणून त्यांच्या मागे का उभे राहिले नव्हते. तेव्हा महिली त्या नव्हत्या का. महिलांना समोर करुन कोणीही राजकारण करु नये. अशा इशाराही गवळी यांनी यावेळी दिली.

ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली.

रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.