नागपूर : तालिबानपासून (taliban) सावध राहायला हवं. तालिबान कदाचित बदललं असेल, पण चीन आणि पाकिस्तान बदललंय का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सवाल केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. नागपूरमध्ये यंदाचा हा सोहळा मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'शस्त्र पूजा' केली आहे. मोहन भागवत यांनी अनेक बाबींवर भाष्य केलंय
मुस्लिम लोकसंख्या का वाढली? भागवत म्हणाले....
भागवत म्हणाले, लोकसंख्येच्या दरातील फरकामुळे मुस्लिम लोकसंख्या वाढली. देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मुस्लिम लोकसंख्या वाढणे आणि तिथल्या मुस्लिम जनसंख्येची सरासरी ही देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याचं दर्शवते. आपल्या देशात पुन्हा एकदा लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा. लोकसंख्या धोरण असले पाहिजे. तसेच. आपण याबद्दल पुन्हा विचार केला पाहिजे. सध्या भारत हा तरुणांचा देश आहे. 30 वर्षांनंतर, हे सर्व म्हातारे होतील, मग त्यांना खायला घालण्यासाठी हात देखील लागतील. आणि त्यासाठी किती लोक काम करतील, या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल. पुढील 50 वर्षांचा विचार करता एक रणनीती बनवली पाहिजे. ज्याप्रमाणे लोकसंख्या ही समस्या बनू शकते, त्याचप्रमाणे लोकसंख्येचे असंतुलन ही समस्या बनू शकते.
..म्हणून तरुण ड्रग्जला बळी पडतात
"कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवं."स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. 'स्व'चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
दोन राज्यांत संघर्ष का?
यावेळी मोहन भागवत यांनी अनेक गोष्टींवर निशाणा साधला आहे. त्यांनी दोन राज्यांमधल्या संघर्षावर भागवतांनी बोट ठेवलंय. दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये संघर्ष होतो? आपल्या राजकारणासाठी सरकारांमध्ये संघर्ष का होतो? असा सवाल त्यांन उपस्थित केलाय. त्यांनी पुढे म्हटलंय की, आपल्या संविधानामध्ये आपण एका भारताचे लोक असल्याचं म्हटलंय. ही व्यवस्था फेडरल आहे. लोक फेडरल नाहीयेत, हेही त्यांनी सांगितलंय.
चीन आणि पाकिस्तान बदलला आहे का?
तालिबानला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये रशियाही होता, चीन आणि पाकिस्तानही आहेत. तालिबान कदाचित बदलला असेल पण चीन आणि पाकिस्तान बदलला आहे का? चीनचा भारताबद्दलचा हेतू बदलला आहे का, असे मुळीच नाही. प्रेमाने, अहिंसेने सर्व काही ठीक होते, ते स्वीकारले पाहिजे,असे भागवत म्हणाले
आणखी काय म्हणाले मोहन भागवत?
जग दुष्टांचं आहे. सामर्थ्याशिवाय ते सत्य स्वीकारत नाही -
हात उचलणाऱ्याचा हात राहूच नये इतकं सामर्थ्य हिंदू समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे - मोहन भागवत
जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारतीय आहेत, भारताचे एक अंग आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे - मोहन भागवत
कलम ३७० गेल्यामुळं जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्यांना फायदा झालाय; मोहन भागवत यांचा दावा
तालिबानपासून सावध राहायला हवं. तालिबान कदाचित बदललं असेल, पण चीन आणि पाकिस्तान बदललंय का?; मोहन भागवत यांचा सवाल
लोकसंख्या जशी समस्या असू शकते, त्याचप्रमाणे लोकसंख्येचा असमतोलही समस्या ठरू शकतो
देशात लोकसंख्या धोरण असायला हवं. याआधीही यावर सरकारनं विचार केलाय. पण पुन्हा विचार करायला हवा -
देशात एक प्रकारचा उत्साह आहे. क्रीडा क्षेत्रातील भारताच्या यशातून हे दिसून आलंय - मोहन भागवत
राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे योगदान दिलंय. आपलं काही तरी आपण पुन्हा मिळवलंय ही भावना त्यामागे आहे
करोनाच्या संकटानं देश घाबरलेला नाही. आर्थिक क्षेत्रात पुन्हा तेजी आली आहे असं दिसतंय -
करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहिलं पाहिजे. ही लाट येणार नाही अशी आशा करूया. पण त्यासाठी तयार राहूया. संघानं त्यासाठी तयारी केली आहे -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.