"धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांचं समर्थन होऊ शकत नाही"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी याबद्दल आपली बाजू मांडली.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal
Updated on

हरीद्वारला (Haridwar) झालेल्या धर्म संसदेत काही कथित साधू महंतांनी केलेल्या वक्तव्यावरून (Dharma Sansad Hate Speech) देशात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात काही लोकांवर कारवाई सुद्धा झाली. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. मोहन भागवत यांनी धर्म संसदेतील वक्तव्यांना विरोध दर्शवला आहे. या विधानांशी आपण असहमत असून हे हिंदुत्व नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे लोक त्या विधानांचं कधीच समर्थन करणार नाहीत असंही ते म्हणाले.

Mohan Bhagwat
Budget Session : पंतप्रधान मोदी आज लोकसभेत बोलणार

मुंबईत रविवारी 'राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व' या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, धर्म संसदेत केलेली विधानं हिंदूत्वाला शोभेसे नाहीत. ते म्हणाले, 'मी कधी रागात काही बोललो असेल तर ते हिंदुत्व नाही.' रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेचा संदर्भ देत संघप्रमुख म्हणाले की, आरएसएस किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वत्कव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. मोहन भागवत यांनी यावर बोलताना सांगितलं की, वीर सावरकरांनी हिंदू धर्मातील समुदायाच्या एकतेबद्दल, त्यांना संगठित करण्याबद्दल मत विचार मांडला होता. त्यांनी त्या गोष्टी भगवद गीतेचा संदर्भ देत मांडल्या होत्या. कुणालाही संपवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी ते बोलले नव्हते.

Mohan Bhagwat
पत्नीचं तिकिट कापल्यानं खूश झालेल्या नेत्याला भाजपची उमेदवारी

भारत देश हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, कुणी मान्य करो की न करो हा देश हिंदू राष्ट्र आहे. देशाच्या संविधान देखील हिंदुत्वाला पुरक आहे. पुढे ते असंही म्हणाले की, लोकांमध्ये भेद निर्माण करण्यात नाही तर समाजाला एकत्र आणण्यावर संघाचा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.