RSS On BJP Maharashtra: "भाजपचा 'ग्राउंड लेव्हल' संपर्क कमी झाला," फडणवीस यांच्यासमोर RSSची नाराजी

RSS On BJP Maharashtra: संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी नेमके काय करायला हवे, याबाबतही सूचना केल्या.
RSS On BJP Maharashtra
RSS On BJP MaharashtraEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या सध्याच्या राजकीय धोरणांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यात यावे, अशी भूमिका मांडली; तसेच पक्षाचा 'ग्राउंड लेव्हल' संपर्क कमी झाल्याचेही निदर्शनास आणून दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संघाच्या प्रभावशाली पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. बैठकीत संघाने फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत आपल्या भावना सांगितल्या. त्यानुसार त्यांनी भाजपची राज्यात नेमकी काय अवस्था आहे, हे थेट सांगितले.

संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी नेमके काय करायला हवे, याबाबतही सूचना केल्या.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले, की पक्षाचा वास्तव परिस्थितीशी असलेला संपर्क कमी झाला आहे. भाजपने आता जमिनीवरील वास्तव जाणून घेतले पाहिजे. यासाठी आता जुन्या कार्यकत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. आतापर्यंत जे झाले ते झाले, पण आता त्यात बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वांना सांभाळा, कुणाला डावलू नका मराठा, दलित आणि मुस्लिम दुखावल्याने लोकसभेत भाजपला फटका बसला होता. विशिष्ट समाज अथवा जातींबाबत असलेली भूमिका बदलण्याची गरज असल्याचे नमूद करीत सर्व समाजांतील सर्व घटकांना सांभाळा, त्यांना डावलून चालणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, हे करतानाच हिंदुत्वाची लाइन सोडू नका, असा सल्लाही दिला.

परिवाराशी समन्वय वाढवा

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आता भाजपला संघाच्या मदतीची गरज राहिलेली नाही, असे विधान करून खळबळ उडवून दिली होती.

लोकसभा निकालानंतर भाजपने पुन्हा एकदा संघाशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अशा बैठका आयोजित केल्या जात आहेत.

RSS On BJP Maharashtra
ST E-Ticket Refund: एसटी संपामुळे ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळणार का? वाचा काय आहे नियम

छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीतही संघ परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपने संघ परिवाराशी अधिक समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट सुचविले.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी संघाने भाजपकडून पक्ष काय करणार आहे, हे जाणून घेतले व बूथनिहाय संघाचे कार्यकर्ते कामाला लावण्याची रणनीती तयार केल्याचे सांगण्यात आले.

RSS On BJP Maharashtra
ST Worker Samp Swargate: पुण्याहून एसटी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, स्वारगेटवरून धावताहेत फक्त 'इतक्या' गाड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.