मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे (Karnataka Hijab Row) पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहेत. सोलापूर, मालेगाव, बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आज पुण्यात हिंदू महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढली. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशा महिलांना इशारा दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातील सर्वात महत्वाचा अधिकार आहे, असं मला वाटतं. त्यामुळे कुणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. झुंडशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर कर्नाटकसारखे प्रकार केले तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
कर्नाटकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबवरून वातावरण तापलं आहे. फेब्रुवारी महिन्यात हिजाब प्रकरण चांगलंच चिघळलं. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. दोन दिवसांपूर्वी हिजाब घातलेल्या मुलीला काही भगवे शेले घेतलेल्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने पुण्यात महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन केले. यावेळी काही महिलांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. त्यानंतर हिंदू महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र परिधान करून कसबा गणपती ते लाल महाल परिसरात रॅली काढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.