रूपाली पाटील म्हणाल्या, सध्याची परिस्थितीत पाहता उद्धव व राज यांनी...

Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times
Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील परिस्थिती मागे कोण आहेत आणि सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी खूप योगदान दिले आहे. आताच्या परिस्थितीत त्यांच्या दोन्ही मुलांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या. (Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times)

भावाने बिकट परिस्थितीत भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना असे वाटते, असेही रूपाली पाटील म्हणाल्या.

Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times
जयंत पाटील म्हणाले, हा महाविकास आघाडीला झटका नाही

रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा सल्ला दिला असल्या तरी राज ठाकरे हे एकनाथ गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. खुद्द एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला होता. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे दोनदा फोनवर बोलणे झाले आहे. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे राज यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याचे समजते.

एकनाथ शिंदेसह सुमारे ४० शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे सरकार आणि पक्ष दोन्ही अडचणीत सापडले आहेत. शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेला खऱ्या अर्थाने अडचणीत आणले आहे. यामुळेच सरकारसोबत पक्ष कोणाचा असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Rupali Patil said that Uddhav and Raj Thackeray should come together in difficult times
ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्तीबद्दल केदार दिघे यांची पोस्ट; म्हणाले...

...तर शिवसेनेच्या अस्तित्वावर परिणाम

मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ५६ आमदार निवडून आले होते. मुंबईचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आमदारांची संख्या ५५ झाली. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह गुवाहाटीत आहेत. त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे यांची गटबाजी अन्य कोणत्याही पक्षात विलीन झाल्यास शिवसेनेच्या अस्तित्वावर परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.