Rupali Thombare VS rupali chakankar: राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांना पक्षातच विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचे नाव चर्चेत आहे. या संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरुन रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया देत, चाकणकरांच्या नावाला विरोध केला आहे.
रुपाली ठोंबरे म्हणाल्यात की, एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले.