मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

मागील ५० वर्षाहून अधिक काळ सीमाप्रश्‍‍न धगधगत आहे. सर्वोच्‍च न्यायालयात यावर सातत्याने सुनावणी होत आहे.
Karnataka Border Dispute
Karnataka Border Disputeesakal
Updated on
Summary

ग्रामविकास विभागाने मागवलेल्या या माहितीचा नेमका वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याबद्दल मात्र कमालीची गुप्‍तता पाळली आहे.

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या (Karnataka Border Dispute) गावांची माहिती अचानकपणे ग्रामविकास विभागानं (Rural Development Department) मागवून घेतल्याने ग्रामपंचायत विभागाची एकच तारंबळा उडाली. सायंकाळपर्यंत सीमेलगत असणा‍ऱ्या चंदगड, गडहिंग्‍लज, कागल व शिरोळ तालुक्यातील ६९ गावांची माहिती संकलित केली.

Karnataka Border Dispute
Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

या गावांच्या विकासाशी संबंधित गाव विकास आराखडे ग्रामविकास विभागाला सादर केले. सीमाप्रश्‍‍नाच्या अनुषंगाने ही माहिती घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित गावांना केंद्र शासनाकडून दिलेल्या योजना, त्यासाठीचा निधी व त्यातून केलेली विकासकामे यांच्या माहितीचा समावेश आहे. अशाच पद्ध‍तीने राज्याने दिलेल्या योजनांची माहितीही सादर केली आहे.

मागील ५० वर्षाहून अधिक काळ सीमाप्रश्‍‍न धगधगत आहे. सर्वोच्‍च न्यायालयात यावर सातत्याने सुनावणी होत आहे. दोन्‍ही राज्यातून सीमाभागावर दावे केले जात आहेत. यामध्ये केंद्र शासनाची भूमिका निर्णायक राहणार आहे. या सर्व पा‍‍र्श्‍वभूमीवर जिल्‍ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांची माहिती मागवली. यामध्ये विशेषत: गाव विकास आराखड्याची मागणी केली आहे.

Karnataka Border Dispute
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

या आराखड्यात गावांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आहे. ग्रामविकास विभागाने मागवलेल्या या माहितीचा नेमका वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याबद्दल मात्र कमालीची गुप्‍तता पाळली आहे. चौकशी करुनही याबद्दलचा तपशील सांगितलेला नाही.

सर्वोच्‍च न्यायालयात सीमाप्रश्‍‍नाबाबत सुरु असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने ही माहिती मागवली असल्याचीही चर्चा आहे. तसेच केंद्र शासनाकडून या गावांना अधिकचा निधी दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुढील दोन-तीन दिवसात या माहितीमागचे नेमके कारण स्‍पष्‍ट होणार आहे.

Karnataka Border Dispute
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

कर्नाटक सीमेलगत असणा‍ऱ्या गावांची माहिती सादर केली आहे. यामध्ये गावांच्या विकासाचा २०२३-२४ चा गाव कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांना मिळालेला निधी तसेच राज्यांनी दिलेल्या निधीच्या माहितीचा समावेश आहे.

-अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

तालुकानिहाय गावे

  • गडहिंग्‍लज (१९) ः बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ, हसूरचंपू, माद्याळ, मुत्‍नाळ, हिटणी, नांगणूर, आरळगुंडी, कडलगे, इदरगुच्‍ची, चंदनकुड, हलगर्णी, तेरणी, कवळीकट्टी, बुगडीकट्टी, लिंगनूर तर्फ नेसरी, हेब्‍बाळ, जलद्याळ, हडलगे.

  • चंदगड- (१६) ः शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, देवरवाडी, सुरुते, ढेकोळी, तुडिये, म्‍हाळुंगे खालसा, कोलिक, कौलगे, होसूर, किटवाड, कामेवाडी, राजगोळी खुर्द, महिपालगड, राजगोळी बुद्रुक, खन्‍नेहट्टी (कुदनूर).

Karnataka Border Dispute
Kolhapur News : आमचा जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन होणार का? करवीर तालुक्यात 101 कुटुंबं दरडीच्या छायेत
  • कागल- (१८) ःअर्जुनी, करनूर, करड्याळ, कापशी बाळिक्रे, कौलगे, गलगले, गोरंबे, चिखली, जैन्याळ, बाळेघोल, म्‍हाकवे, लिंगनूर कापशी, लिंगनूर दुमाला, वंदूर, शेंडूर, शंकरवाडी, सुळकुड, हणबरवाडी.

  • शिरोळ- (१६) ः शिवनाकवाडी, अब्‍दुललाट, लाटवाडी, घोसरवाड, दतवाड, जुने दानवाड, टाकळी, राजापूरवाडी, खिद्रापूर, राजापूर, अकिवाट, बस्‍तवडे, आलास, गणेशवाडी, शेडशाळ व कनवाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()