PM Modi Pune Visit: मोदी- पवार एका मंचावर; 'तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा', सामनातून राऊतांचा चिमटा

लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याआधी सामनातून टीकास्त्र
PM Modi Pune Visit
PM Modi Pune VisitEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. सामनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

'महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही', असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

'खरे तर लोकांच्या मनात आपल्याविषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. आता शरद पवारांचे म्हणणे असे की, तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल; पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती', असंही सामनात लिहलं आहे.

PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit: पंतप्रधानांची तिसरी पुणेवारी! या ३ कारणांमुळे मोदींचा दौरा ठरणार भाजपसाठी मास्टरस्ट्रोक

लोकमान्यांनी सांगितले आहे, ‘समाजाचा पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा आणि स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी लागत असते.” ते आज आठवते. श्री. शरद पवार हे ‘मऱ्हाटे’ आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात. तेव्हा त्यांच्याकडून वेगळय़ाच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे.

'देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय व त्या लढय़ासाठी ‘इंडिया’ ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत. मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकूमशाही वृत्तीचे विधेयक आणणारे श्री. मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील व शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.'

PM Modi Pune Visit
Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती! पुन्हा कधी मुसळधार जाणून घ्या हवामानाचा विभागाचा अंदाज

'देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि अराजकावर काहीच बोलायला तयार नाहीत. मणिपुरात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान मौनात आहेत.'

'देशाच्या नायकाने संकटकाळी मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे.'

नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी, गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन!

PM Modi Pune Visit
Jaipur-Mumbai Exp Firing: "फक्त मोदी अन् योगीच..", एक्सप्रेसमध्ये गोळीबार केल्यावर कॉन्स्टेबलने घेतले ठाकरेंचेही नाव, Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.