मलिकांचे ‘सत्य’ कथन, ‘झाकली मूठ’च केली उघड; सामनातून टिकास्त्र

sanjay raut
sanjay rautesakal
Updated on

मुंबई : आजच्या सामनामधून (saamana editorial) गोव्याच्या भाजप सरकारवर (bjp) टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (satyapal malik) यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, असा टोमणा अग्रलेखातून मारला आहे.

गोव्याच्या भाजप सरकारवर टीका

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, असा टोमणा अग्रलेखातून मारला आहे. गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच कोव्हिड काळात गोवा भाजप सरकारने मोठा झोल केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनामधून गोव्याच्या भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे.

sanjay raut
धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; Cyber cell कडे तक्रार

देशातील कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र खाली बसायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. मात्र आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात बोलताना केला आहे.

sanjay raut
Good Morning म्हणत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा

गोवा सरकारने राबविलेली ‘घर-घर रेशन’ ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ती राबवली गेली, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात गोव्यातील भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले, असा ठपका मलिक यांनी ठेवला आहे. भाजपची मंडळी मलिक यांचे हे आरोप फेटाळणार, हे तर उघड आहे. परंतु गोव्याबाबत त्यांनी जी विधाने केली आहेत, त्याबाबत शंका उपस्थित होण्याचे काहीच कारण नाही. कारण विद्यमान भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था सर्वच क्षेत्रांत केविलवाणी झाली आहे. तेथील सरकारविरोधात जनमानसात तीक्र संताप आहे. कोरोनाची परिस्थिती या सरकारने नीट हाताळली नाही हे तर आहेच, पण तेथील आरोग्य यंत्रणा साफ कोसळून पडली आहे. कोरोनामुळे गोव्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावरच कुऱहाड पडली. त्यामुळे राज्याचे अर्थकारण जसे बिघडले तसे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या चुली थंडावल्या. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अमली पदार्थांचा गोव्याभोवती पडलेला विळखा कमी होण्याऐवजी घट्टच होत चालला आहे.

sanjay raut
कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद

भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. एका भयंकर दुरवस्थेच्या गर्तेत फेकले गेले आहे. ही ‘झाकली मूठ’ अशीच राहावी, यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत वेगवेगळी स्टंटबाजी करीत आहेत. मात्र गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’कथन करून ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली. भाजप सरकारच्या भ्रष्टाचारापासून कोरोना स्थिती हाताळण्यातील गलथान कारभारापर्यंत मलिक स्पष्ट बोलले आहेत. गोवेकर जनता तर रोजच त्याचा अनुभव घेत आहे. मलिक यांच्या ‘सत्य’कथनाने गोव्याची सर्वच पातळय़ांवर झालेली दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली इतकेच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.