शिवसेनेच्या 'या' माजी मंत्र्यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून चिपळूण रुग्णालयाला मदत

shivsena
shivsena sakal media
Updated on

मुंबई : शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर (sachin Ahir) यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या (sankalp pratishthan) वतीने चिपळूण-कामथे (chiplun) येथील उपजिल्हा रुग्णालयाला (hospital) पॅरा मेडिकल मॉनिटर आणि ई.सी.जी. मशीन (medical kits) देण्यात आले.

shivsena
'मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपानंतर जयंत पवारांनी लिहिलेलं 'हे' नाटक गाजलं'

शिवसेना चित्रपट विभागाचे उपाध्यक्ष सिनेअभिनेते सुशांत शेलार यांच्याहस्ते कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात ही उपकरणे देण्यात आली. माजी आमदार सदानंद चव्हाण यावेळी हजर होते. कोविड पूर्णपणे हद्दपार झालेला नाही, अशावेळी अहिर यांची ही वैद्यकीय मदत निश्चितच उपयुक्त ठरेल, असे शेलार यावेळी म्हणाले. तर कोरोनाकाळात या उपजिल्हा रुग्णालयाने साडेतीन हजार रुग्णांना बरे करून घरी पाठविण्याचे उत्तम काम केले आहे. या रुग्णालयास गरजेची असलेली ही यंत्रसामुग्री मिळाल्याने रुग्णांना त्याचा पुष्कळ फायदा होईल, असे माजी आमदार सदानंद चव्हाण म्हणाले.

सचिन अहिर व संगीता सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नेहमीच असे सामाजिक उपक्रम केले जातात. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केलेल्या या मदतीचे सर्वत्र स्वागत होत आहे. आपण देखील रत्नागिरी जिल्ह्यातीलच असल्याने या मदतीचे मला मोठेच कौतुक आणि अभिमान वाटतो, असे शेलार यावेळी म्हणाले. तर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला पराभूत करण्यात कामथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय सानप व त्यांच्या वैद्यकीय पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे सदानंद चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या समारंभाला क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख संदीप सावंत, तालुका समन्वयक राजू देवळेकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक रश्मी गोखले, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, माजी सभापती दिलीप सावंत, माजी सभापती धनश्री शिंदे आदी विविध विभागाचे मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.