राज ठाकरे यांना साक्षात्कार झाला का, सचिन अहिरेंचा खोचक सवाल
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे भोंग्यांबद्दल बोलायला लागले आहेत, त्यांना आता साक्षात्कार झाला का? असा सवाल शिवसेना नेते सचिन अहिरे यांनी केला आहे. महापालिकेत मनसेचे नगरसेवक होते ते आता सत्तेत नाहीत, त्यामुळे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पायाखालची वाळू घसरत चालली आहे. जनतेलाही या पक्षावर विश्वास नाही. त्यामुळं भाजपसोबत (BJP) असल्याचं मनसेनं जाहीर करावं, असं खुलं आव्हानही अहिरे (Sachin Ahire) यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम उत्तम चालू आहे ते जनतेला दिसत आहे. भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर अहिरे म्हणाले, राज ठाकरे यांना भोंग्याबाबत उशिरा जागा आली आहे. त्यामुळे मनसेची सी टीम कोण आहे हे बघयाला मिळाले आहे. मनसेचा (MNS) स्टँड अप कोण आणि त्याचं लिखाण कोण करतंय हेही माहिती असल्याचं म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. महापालिकेत मनसेचे नगरसेवक होते, ते आता गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. जनतेला आता मनसेवर विश्वास राहिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, राज ठाकरे यांनी आता ते भाजपासोबत आहेत हे जाहीर करावं. कालची भेट राजकीय असल्यामुळे नाकारता येणार नाही. एमआयएमनी फर्मान काढलं आहे मात्र एमआयएम आणि सी टीमची ही रणनीती असण्याची शक्यताही त्यांनी दर्शवली आहे.
दरम्यान, शिवतीर्थावरील भाषणात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याला अनेकदा विरोध झाला आहे. पहाटे पाच वजतापासून भोंगे वाजत असल्याने झोप होत नाही. परीक्षेच्या काळात मुलांचा अभ्यास होत नाही. असे अनेक कारणं पुढे करत भोंग्यापासून सुटका मिळावी अशी मागणी होत असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली होती. दरम्यान आता अहिरे यांच्यानंतर शिवसेना आणि मनसेतील वाद कोणते वेगळे वळण घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.