'शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, हा भाजपचा कट'

Sachin-Sawant on Shivaji Maharaj
Sachin-Sawant on Shivaji Maharaje sakal
Updated on

मुंबई : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalized) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले असून बेळगावमध्ये दगडफेक (Belgaum Agitation) करण्यात आली. त्यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करतेय, असं सावंत म्हणाले.

Sachin-Sawant on Shivaji Maharaj
समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

''बंगळुरुला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही'', असं सावंत म्हणाले.

''शिवरायांच्या नावाचा उपयोग संधीसाधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचे हा भाजपाचा कट आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार मराठी भाषिकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी'', अशी मागणी करत त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला.

नेमकी काय आहे घटना? -

बंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी रात्री अचानक शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौकात रस्त्यावर उतरले. याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक देखील केली. आज आणखी बेळगावमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.