सध्या राज्यातील महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात वाद चांगलाच रंगला आहे, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पंतप्रधान मोदी फक्त दोन तास झोपतात या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे, त्यांनी थेट गीतेचा संदर्भ दिला सोबतच झोप न येणे हा मानसिक रोग असल्याचे देखील म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, यावर सावंत यांनी ट्विट करत भाजपा तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केलीय. चंद्रकांत पाटीलजी, भगवद्गीता ढोंगी भजपने आधी वाचावी असा सल्ला देत, त्यांनी लिहलं की, "चंद्रकांत पाटीलजी भगवद्गीता ढोंगी भाजपाने आधी वाचावी, अध्याय ६-१६ नात्यश्र्नतस्तु योगोSस्ति न चैकान्तमनश्र्नतः | न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन || हे अर्जुन! जो अधिक खाता है या बहुत कम खाता है, जो अधिक सोता है या जो पर्याप्त नहीं सोता उसके योगी बननेकी कोई सम्भावना नहीं है" असे म्हटलं आहे.
इतक्यावरच सावंत थांबले नाहीत, त्यांनी दुसरे एक ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी , "त्यातही झोप न येणे (Insomnia) हा मानसिक रोग आहे. चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे खरे असेल तर कदाचित यामुळेच देशात गेले आठ वर्षे चुकीचे निर्णय होत असतील. दादांनी पंतप्रधानांना वैद्यकीय उपचार घेण्याचा आग्रह धरला पाहिजे. त्यातच देशहित आहे." अशा खोचक शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे.
या दरम्यान मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंधीत मालमत्तांच्या 300 कोटींच्या व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून, या घटनेला आता एक महिना पूर्ण होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.