राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमुळे सध्या राजकीय वातवरण चांगलंच गढूळ झालं आहे. शरद पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. याला राष्ट्रवादीनेही प्रतित्त्युर दिलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत एक ट्वीट (Controversial Tweet) केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या तरुणाच्या अटकेची मागणी आता जोर धरु लागली आहेत.
त्या तरुणाच्या आक्षेपार्ह पोस्टवरुन त्याला अटक करण्याची मागणी नेतेमंडळी करत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनीही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोष दिला आहे. त्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात सावंत यांनी एक ट्विट केलं आहे.
यात सावंत म्हणतात, समाजाला हिंसक आणि विकृत बनवण्याचा भाजपा आणि संघपरिवाराचा प्रयत्न देशाला कुठे घेऊन चालला आहे याचा विचार सर्वसामान्य जनतेने करण्याची आवश्यकता आहे. द्वेष आणि तिरस्काराने तरुणांना भविष्यातील मारेकरी बनवले जात आहे. अशा विकृतांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 'झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती,' असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.