मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) हे शंभर कोटी वसुलीच्या आरोपाखाली (Money Laundering Case) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच त्यांची आणि सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) चौकशी केली जात आहे. नुकतीच सचिन वाझेच्या वकिलांनी देशमुखांची उलटतपासणी केली. यामध्ये देशमुखांनी काही दावे केले आहेत.
काही महिन्यांपूर्वी उद्योगपती अंबानी यांच्या अँटीलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजी होती. राज्याच्या गृहविभागाने याप्रकरणाची चौकशी केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. आता सचिन वाझेच्या वकिलांनी चांदीवाल आयोगासमोर देशमुखांची उलटतपासणी केली आहे. त्यांना अँटीलिया प्रकरणाबाबद प्रश्न विचारण्यात आले असता देशमुख म्हणाले, ''अँटिलिया बॉम्ब प्रकरणात परमबीर सिंह यांना 3 अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी सिंह भीतीने थरथरत होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण एटीएसकडे वर्ग करण्याची सूचना केली. परंतु, परमबीर सिंह यांनी त्यावर आक्षेप घेत मुंबई पोलिसांच्या हाती तपास सोपवण्याची मागणी केली. त्यानंतर ६ मार्च २०२१ ला हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आले. तसेच सचिन वाझेची हकालपट्टी केली, अशी माहिती देखील देशमुखांनी केली.
अँटीलिया प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून देशमुखांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच राज्यातील पोलिस भरतीसाठी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप देखील देशमुखांवर करण्यात आला. पोलिसांच्या मदतीने खंडणीचं रॅकेट चालवत असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. आतापर्यंत देशमुखांच्या वकिलांनी चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेची उलटतपासणी केली होती. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.