मुंबईः खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर झाला.
मागच्याच आठवड्यात मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळून लावला होता. आज त्याला सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
दोन वर्षांपूर्वी गाजलेलं अँटिलिया प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालं होतं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता. प्रकरणाचे धागेदोरे सचिन वाझे याच्यापर्यंत येऊन ठेपले होते.
या प्रकरणात वाझेवर कथित शंभर कोटी रुपयांच्या खंडणीची केसदेखील सुरु. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणामध्ये आज वाझेला जामीन मंजूर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.