मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) शंभर कोटी वसुलीच्या आरोपाखाली सध्या कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पण, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेने शंभर कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्याने ईडीला पत्र लिहिले आहे. वाझे यासंदर्भात १४ फेब्रुवारीला न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधाच ईडीने दोषारोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर देशमुखांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर देखील १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रानुसार वाझे माफीचा साक्षीदार झाला तर देशमुखांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. आता न्यायालय त्यांना जामीन देणार की नाही? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
अनिल देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर कबुल केलं होतं. त्यानंतर मंगळवारी वाझेने जबाब बदलण्यासाठी अर्ज केला होता. मी देशमुखांच्या सांगण्यावरूनच वसुली केली आणि त्यांच्या लोकांना वसुलीचे पैसे दिले. माझ्यावर तुरुंगात असल्यापासून अत्याचार होत आहेत. मला वैद्यकीस सेवा देखील पुरवली जात नाही. देशमुख अत्यंत पॉवरफुल व्यक्ती असून त्यांच्यासह इतरांचा माझ्यावर दबाव आहे. पण, मी इतरांची नावे घेणार नाही. कारण, मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, असे खळबळजनक आरोप वाझेने अर्जात केले होते. मात्र, चांदीवाल आयोगाने वाझेचा अर्ज फेटाळून लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.