मुंबई: राज्य सरकारने वाईन (Wine) सुपर मार्केटमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला, असे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. यावेळी तुमच्या सरकारने देखील असाच निर्णय काही दिवसापूर्वी मध्यप्रदेशमध्ये घेतला आहे. मग महाराष्ट्राला का बदनाम करता आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.
ते म्हणतात, आधीच मर्कट त्यात वाईन प्याले. ए भाई जरा देख के चलो,आगे भी नहीं पीछे भीं नहीं उत्तरप्रदेश में योगीराज जीतेंगे देखलो। अश्या शायरी स्टाईलने त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपाला संपवून टाकण्याचं आवाहन करणारं माझं भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा असे आव्हाड यांना टॅग करत सदाभाऊंनी टोला लगावला आहे.
राज्य सरकारच्या वाईन निर्णयावर नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे म्हणत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी टीका केली आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.