Maratha Reservation : प्रस्थापित मराठे 70 वर्षे गांजा ओढत होते की, गोट्या खेळत होते? आरक्षणावरुन सदाभाऊंचा जोरदार निशाणा

फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही.
Maratha Reservation Sadabhau Khot
Maratha Reservation Sadabhau Khotesakal
Updated on
Summary

सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात आहे.

कराड : प्रस्थापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही? देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात असून त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाल्याचा आरोप रयत क्रांतीचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला.

Maratha Reservation Sadabhau Khot
विषयच हार्ड! भारतानं पाकला लोळवताच कोल्हापूर, इचलकरंजीत एकच जल्लोष; तिरंगा, भगवा झेंडा घेऊन तरुणाई उतरली रस्त्यावर

कराड (जि. सातारा) दौऱ्यावर असताना माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने कोणीही मुळाशी जात नाही. फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे असून संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल, अशी मागणी केली.

Maratha Reservation Sadabhau Khot
वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी राजवाड्यातील मोठ्या चोरीचा सांगितला इतिहास, नेमकं काय घडलं?

खोत पुढे म्हणाले, मराठ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालातरांने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समाजचं पोर नोकरीसाठी बाहेर पडलं. तेव्हा मराठा समाजाच्या पोरांच्या लक्षात आलं 100 मार्क मिळवूनही 50 मार्काचा पोरंगा पुढं जातो अन् आपण माग राहतो.

Maratha Reservation Sadabhau Khot
पुरोगामी विचारांचा नेता हरपला! जनता दलाचे नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचं निधन; गडहिंग्लजमध्ये आज अंत्यसंस्कार

तेव्हा मराठा शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती होते अन् शाळा शिकलो तरी माती होत्या, त्यामुळे आता मराठा समाजाचा, शेतकऱ्याचा पोरगा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, प्रस्थापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते का? की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()