शिवसेना नेते बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav Case) प्रकरणात चौकशी दरम्यान आयकर विभागाला डायरी सापडली यात मातोश्रीवर खर्च केल्याचा उल्लेख आढळून आल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी या मुद्यावरून महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. काल एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले होते. तर आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) घणाघात केला आहे.
ट्विट करत सदाभाऊ म्हणाले, आयकर विभागाच्या धाडीत यशवंत जाधव यांच्या डायरीमधून मातोश्रीला ५० लाखाच्या घड्याळ आणि २ कोटिंच गिफ्ट देण्यात आले याची माहिती मिळाली. "मातोश्री हेच सगळ्यांचे आश्रयस्थान" शेवटी हेच अंतिम सत्य आहे असा टोला सदाभाऊंनी लगावला.
यशवंत जाधव प्रकरणाला लागणार वेगळे वळण
शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणात आयकर विभागाला काही महत्वाचे पुरावे सापडले. या तपासात त्यांना एक डायरीही सापडली ज्यात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या डायरीतील एका नोंदीमध्ये 'मातोश्री'ला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणावरून सध्या गदारोळ सुरु आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी किरीट सोमय्या यांचे आंदोलन, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मेंढपाळांच्या हस्ते करण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलेले आंदोलन आणि आता जाधव प्रकरणावरून मातोश्रीवर झालेला खर्च यामुळे या सगळ्या घटनेने आता राजकिय वेगळेच वळण लागण्याची शक्याता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.