बिलाप्रकरणी आरोप करणार्या हॉटेल मालकामागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात - सदाभाऊ
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला होता. हॅाटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आज सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. (Sadabhau Khot latest update of hotel owner billing in sangola)
बिलाप्रकरणी आरोप करणार्या हॉटेल मालकामागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात असून टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीतील एका नेत्याचं हे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊंनी केला आहे. हॉटेल माकल अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या आरोपांना मी घाबरत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकीय खेळीमुळे माझा आवाज दाबता येणार नाही, असंही सदाभाऊ ठणकावून सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, अशोक शिनगारेचं आजही कोणतही हॉटेल नाही. २०१४ च्या निवडणुकीत माझे कार्यकर्ते, सहकारी घरातून भाकरी बांधून आणायचे. कार्यकर्त्यांनी चहासुद्धा हॉटेलात प्यायलेला नाही कारण आमच्याकडे पैसेच नव्हते. अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. २०२० मध्ये सोन्याच्या चोरीचा आणि २०२१ मध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तो वाळुमाफिया आणि दारु विक्रेता असल्याचा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला.
याप्रकरणी सदाभाऊंनी राष्ट्रवादीला धारेवर धरलं आहे. हे राष्ट्रवादीच्या नेत्याचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केल आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पहावं लागणार आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोतांनी केलेल्या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा' असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. असलेल्या माजी कार्यकर्त्याने भर रस्त्यावर सदाभाऊ खोत यांना अडवले आणि उधारीचे पैसे परत मागितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अशोक शिनगारे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते. निवडणुकीमध्ये त्यांनी पदर मोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत आहे. वारंवार उधारीची मागणी करून ही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवून 'आधी उधारी द्या आणि मग पुढे जावा' असं म्हणत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.