भाजपकडून शेवटच्या क्षणी खेळी, सदाभाऊ खोतांना मुंबईला बोलावलं

Sadabhau Khot, Devendra Fadnavis
Sadabhau Khot, Devendra FadnavisEsakal
Updated on

विधानपरिषदेच्या निवडणुकांवरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने प्रत्येकी दोन उमेदवारांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (MLC Election 2022)

तर पाचवी जागा उमा खापरे लढवणार आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप सहावी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आणि चुरस आणखी वाढली आहे. सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. मात्र सहावा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर भाजपकडून शेवटच्या क्षणी पत्ते खोलण्यात आले आहेत. (Maharashtra BJP latest News)

Sadabhau Khot, Devendra Fadnavis
भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट

आज सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाणार आहेत. यावेळी भाजपमध्ये चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री स्वॅब टेस्ट केली आहे. अद्यापही रिपोर्ट प्रतीक्षेत असल्याने बैठक कुठे होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र त्याआधीच घडामोडींनी वेग घेतलाय. सदाभाऊ खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांना भाजपकडून बोलावण्यात आलं असून आज उमा खापरे यांच्यासोबत ते विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत मुंबईला रवाना झालेतय भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ यांना संधी मिळणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

Sadabhau Khot, Devendra Fadnavis
पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

पंकजा मुंडेंना पुन्हा डिच्चू

राज्यसभा तसंच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. तर विधान परिषदेवर पाठवायचं की नाही हा निर्णय पक्ष घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होतील.

भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडेंच्या नावासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र आता सहाव्या उमेदवारासाठीही पंकजा मुंडे यांना डिच्चू देण्यात आल्याचं कळतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()