'फडणवीस तुम्ही पुन्हा या; आमची सुद्धा केतकी चितळेसारखी अवस्था' - सदाभाऊ खोत

फडणवीस साहेब तुम्ही परत या
Devendra Fadnavis And Sadabhau Khot
Devendra Fadnavis And Sadabhau Khotesakal
Updated on

टेंभुर्णी : सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा केतकी चितळे प्रकरणात उडी घेतली आहे. केतकी चितळेच्या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं असे वक्तव्य खोत यांनी केले. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा टेंभुर्णी येथे आज शुक्रवारी (ता.२०) प्रारंभ झाला. त्यावेळी खोत बोलत होते. फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची केतकी चितळेसारखी (Ketaki Chitale) अवस्था झाली असल्याचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. केतकी चितळेनं तशी पोस्ट टाकायला नको होती. (Sadabhau Khot Say, Fadnavis Lets Come, Our Situation Like Ketaki Chitale)

Devendra Fadnavis And Sadabhau Khot
मेहुल चोक्सीला दिलासा, डोमिनिकाने केस घेतली मागे

वाईट पोस्ट कशाला शेअर करायची? असा प्रश्न विचारत ते पुढे म्हणतात, पण काय झाले या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं, नाहीतर गावाला माहिती नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मास्क उतरवणार म्हणे, ते काय चंद्राचा मुखडा आहे का?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. वीज मोफत, सातबारा कोरा झाला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. उजनीचे पाणी बारामतीला आणि बारामतीने नीरा नदी लुटली.

Devendra Fadnavis And Sadabhau Khot
शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस

आता उजनी लुटत असल्याचा आरोप खोत यांनी पवार कुटुंबीयांवर केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अलिबाबाची टोळी असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.