Gautami Patil: "गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली पण वारकरीही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात"

गौतमी पाटील अन् इंदुरीकर महाराज यांचा वाद काही दिवसांपूर्वी रंगला होता
Gautami Patil
Gautami PatilEsakal
Updated on

नृत्यांगना गौतमी पाटील चर्चेत आल्यापासून वारंवार कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात दिसून येते. नृत्यांगना गौतमी पाटील अन् इंदुरीकर महाराज यांचा वाद काही दिवसांपूर्वी रंगला होता. इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. मग गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.

इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली होती. तसेच सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली. आता गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात, असं सदानंद मोरे यांनी म्हंटलं आहे. यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खोचक टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Gautami Patil
Eknath Shinde : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी CM शिंदे आले धावून; मविआच्या सभेला जात असताना...

इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात किर्तनांला मिळणारे पैसे आणि लावणीसाठी मिळणारे पैसे यावरून वाद निर्माण झाला होता. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो, असे इंदूरीकर महाराज म्हणाले होते.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली होती की, मी काय बोलणार त्यांच्याविषयी. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजन का केलं असतं. आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली होती.

Gautami Patil
Ajit Pawar: अजितदादा भाजपमध्ये जाणार? एकनाथ खडसेंची म्हणाले, 'मी दादांसोबत बोललो…'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()