Sahitya Sammelan 2023 : बाळासाहेब ठाकरे साहित्य संमेलनाला चक्क बैलबाजार म्हणाले होते

जेव्हा बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला घेतलेले २५ लाख परत करा, असे सुनावले!
Sahitya Sammelan 2023
Sahitya Sammelan 2023 esakal
Updated on

९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरूवात होत आहे.  ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, वर्धा येथे होईल. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.

आजवर या साहित्य संमेलनाला अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी १९९५ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात झालेला वाद राजकियदृष्ट्याही गाजला. त्यात शिवसेना विरूद्ध साहित्य संमेलन असे चित्र पहायला मिळाले होते. काय होते ते प्रकरण पाहुयात.

Sahitya Sammelan 2023
बालकुमार साहित्य संमेलन नऊ फेब्रुवारीपासून

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे म्हणजे जिवंत तोफचं. ती कधी कोणावर डागली जाईल याचा नेम बाळासाहेबांनाही नव्हता. बाळासाहेब जितके स्पष्टवक्ते तितकेच ते हळवेही होते. त्यामुळेच ते आजही मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करतात. कारण, ते मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढले. पण, बाळासाहेबांचे नाव मराठी साहित्य संमेलनावर टिका करणाऱ्या लोकांतही घेतले जाते.

Sahitya Sammelan 2023
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तपासणी शिबिर

१९९५ मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आले तेव्हा पहिला वाद झाला तो बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने. या वादाचे मळभ १९९७च्या जानेवारीत नगर येथे झालेल्या ना. सं. इनामदार यांच्या संमेलनावर होते. 

Sahitya Sammelan 2023
साहित्य संमेलनातून साहित्यिक घडावेत

दोन वर्षांनी पुन्हा मुंबईत हेच घडले. हे साहित्य संमेलन पाच ते सात फेब्रुवारी, १९९९ या दिवसांत शिवतीर्थावर ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेव्हा राज्यात युतीचेच सरकार होते. स्वागताध्यक्ष मनोहर जोशी संमेलनाच्या काही दिवस आधी मुख्यमंत्रिपदावरून गेले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात वसंत बापट यांनी आविष्कार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केले वादाची ठिणगी पडली.

Sahitya Sammelan 2023
Uddhav Thackeray यांनी शिवसेना कार्यकत्यांना iPhone वापरायला सांगितलं यात किती तथ्य आहे? 

मुख्य संमेलनाच्या विरोधात होणारी विद्रोही व सकल संमेलने हा आधी वादाचा, चर्चेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी ‘सरकारचे २५ लाख रुपये घेताना साहित्यिकांना शरम वाटली नाही का? हे आमच्यावर कशासाठी टीका करताहेत? यांनी समाजासाठी काय केले आहे?’ अशा जबरदस्त फैरी झाडून तो सामना ‘शिवसेना विरुद्ध साहित्यिक’ असा करून टाकला. सरकारी अनुदानाचे २५ लाख परत करा आणि मगच टीका करा. साहित्य संमेलन म्हणजे नुसता बैलबाजार असतो.’ असेही त्यांनी सुनावले.

Sahitya Sammelan 2023
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकला दालनाचे उद्‍घाटन

यावर साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच वसंत बापट समारोपीय भाषणात सडकून प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही घेणारे असताना, तुम्हाला देण्याची सवय कधी लागली?’ या बोचऱ्या प्रश्नापासून ‘आम्ही तुमच्या २५ लाखच काय, २५ कोटी असतील तरी त्यांच्यावर थुंकतो,’ असे बापट म्हणाले.

Sahitya Sammelan 2023
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोककलांचाही जागर

पुढे ते म्हणाले की, ‘कोणीही एखादा दांडगेश्वर आमच्या तोंडात २५ लाखांचे बूच ठोकू पाहात असला तरी, आमचा आत्मा आम्ही काही विकायला काढलेला नाही. एखाद्या हुकूमशहाने कितीही शर्थ केली तरी सामान्य माणसे त्याचा ‘रिमोट कंट्रोल’ मोडून-तोडून फेकून देऊ शकतात,’ असे बापट संतापून म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.