SAKAL Impact : पोलिस भरतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्र्यांनी केले जाहीर

Devendra Fadanvis on Police Bharati
Devendra Fadanvis on Police Bharatiesakal
Updated on

नाशिक : तीन वर्षांनंतर सुरू झालेल्या राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेला ‘सर्व्हर डाऊन’ ने खोडा घातल्याने उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढीचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. पोलिस भरतीसाठी नियोजनानुसार उद्या (ता.३०) अखेरची मुदत होती.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Devendra Fadanvis on Police Bharati
Nashik News : पोलिस अकादमीत आणखी 2 अधीक्षक; राज्यातील 19 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र नाराजी होती. राज्य सरकारने भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवीत ३० नोव्हेंबरपर्यंत www.policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दिली होती. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत होता.हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

यातून समस्या वाढत जाऊन उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आत्तापर्यंत राज्यभरातून ११ लाख ८० अर्ज आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून दिली आहे. तसेच, ज्या उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणी येत आहेत, अनेकांना प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकलेले नाही, अशा सर्व उमेदवारांसाठी मुदतवाढ देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadanvis on Police Bharati
Nashik Crime News : निलंबित तलाठ्यासह पत्नीचा सरकारवाडा पोलिसांत गोंधळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.